खर्जेच्या स्वस्त धान्य दुकानावर कारवाईची मागणी

0

नवापूर । तालुक्यातील खर्जे येथील स्वस्त धान्य दुकानांबाबतीत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनातर्फे दुर्लक्ष होत असल्याने, अखेर या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याबाबत तत्काळ कारवाई करावी, अन्यथा 25 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माजी जिप सदस्य भरत गावित यांच्या नेत्वृखाली नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

वारंवार तक्रार केल्याचा दाखला
नवापूर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, खर्जे गावातील ग्रामस्थांनी स्वस्त धन्य दुकाना बाबत अनेक वेळा तहसील कार्यालयात लेखी तक्रारी देऊनही काहीच कारवाई पुरवठा विभागाकडून केली जात नाही. स्वस्त धान्य दुकान सिंधू शरद वसावे यांच्या नावाने असून वारंवार तक्रारी अर्ज दिले होते तरी देखील पुरवठा विभागाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. आता कारवाई न झाल्रास 25 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थ आमरण उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे निवेदनावर सरपंच जयवंत पाडवी, सुरेश गावित, निमु वसावे, दिलीप वसावे सुरेश वसावे, किल्या वळवी, बापू वसावे, विना वसावे, अनिल नाईक आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.