खलघाट बस अपघात : 12 मृत प्रवाशांवर आज होणार अंत्यसंस्कार
राज्य शासनातर्फे मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत : पंतप्रधान कार्यालयासह मध्य प्रदेश देणार दोन व चार लाखांची मदत
इंदौर : अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस (एम.एच.40 एन.9848) विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात नर्मदा नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत 12 प्रवासी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे घडली होती. दरम्यान, एस.टी.अपघातात मयत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची मदत तातडीने देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून 12 मृतांची ओळख पटवण्यात यश आले. मृतांमधील पाच जण जळगावसह धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, सर्व मृतांवर मंगळवार, 19 रोजी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एस.टी.चालक-वाहकासह या 12 प्रवाशांचा झाला मृत्यू
1) एस.टी. वाहक प्रकाश श्रावण चौधरी (शारदा कॉलनी, अमळनेर)
2) एस.टी.बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (45, अमळनेर)
3) अविनाश संजय परदेशी (पाटणसराई, ता.अमळनेर)
4) निंबाजी आनंदा पाटील (60, पिळोदा, ता.अमळनेर)
5) आरवा मुर्तजा बोरा (27, मूर्तिजापुर, अकोला, माहेर अमळनेर)
6) राजू तुळशिराम (रावतफाटा, चितोडगढ, राजस्थान)
7) जगन्नाथ हेमराज जोशी (68, मुकामपूर मल्लाडा, उदयपूर, राजस्थान)
8) चेतन रामगोपाल जांगीड (नाकगलकला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान)
9) सैफउद्दीन अब्बासअली बोहरा (मुरानी नगर, इंदौर, मध्यप्रदेश)
10) विकास सतीश बेहरे (33, विरदेल, जि.धुळे)
11) कल्पना विकास उर्फ गुलाबराव पाटील (57, बेटावद, ता.शिंदखेडा)
12) रुख्मिणीबाई नारायण जोशी (बागोर, उदयपूर, राजस्थान)