Stealing of livestock from barns from Satod यावल : तालुक्यातील सातोद गावातून खळ्यात बांधलेला सात हजार रुपये किमतीचा गायीचा गोर्हा चोरट्याने लांबवला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूधन चोरीमुळे खळबळ
सातोद गावातील रहिवासी नोमेश बाळू पाटील यांनी खळ्यात पशूधन बांधले होते व रात्री त्यांना चारा पाणी करून ते घरी गेले. शुक्रवारी सकाळी जेव्हा ते खळ्यात आले तेव्हा गोर्ह्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध सात हजार रूपये किंमतीचा गोर्हा चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहेत.