खांदा कॉलनीतील आई मित्र मंडळातर्फे एक वही एक पेन अभियान

0
नवी मुंबई | खांदा कॉलनीतील आई मित्र मंडळातर्फे एक वही एक पेन अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत जमा झालेल्या २००० वहया आणि २००० पेन वाकड़ी येथील अण्णासाहेब माध्यमिक शाळे आदिवासी मुलाना नगरसेवक संजय भोपी व वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील कोळी यांच्या हस्ते वहया वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमला मयूर शेळके, प्रेमा भोपी, मनीषा कोली,सनिका इंदुलकर तसेच आई मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित कोळी, अभिषेक भोपी, कार्याध्यक्ष अनिकेत लाखे व खजिनदार विनायक कोली पदाधिकारी उपस्थित होते.