जळगाव । प्रशासनाच्या चालढकल व दूर्लक्षधोरणांमुळे प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फैडरेशनतर्फे राज्यभर महावितरण कार्यालयासमोर व्दारसभा घेण्यात आली. यानुसार आज जळगाव परिमंडल कार्यालय ऑफीससमोर 1.30 वाजता सभा व जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. याप्रसंगी वर्कर्स फेडरेशनचे व्यवस्थापन समिति सदस्य जे. एन. बाविस्कर आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. तर फेडरेशनचे झोन सेके्रटरी अरविंद देवरे यांनी सांगितले की, वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय नेतृत्वाने कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांचा प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा निर्धार केला आहे. पी. एम. अडकमोल यांनी आंदोलनचा उद्देश्य स्पष्ट केले. फेडरेशनचे सर्कल सेक्रेटरी विरेंद्रसिंग यांनी महावितरण मुख्यालय मुंबई येथील दिलेल्या पत्रातील 21 प्रमुख मागण्यांचा आढावा घेतांना सागितले की, महावितरणचे विभाजननंतर फ्रैंचाइजी धोरण करणे म्हणजे जनताभीमुख असलेला उद्योग खाजगी भांडवलदारांच्या घशात हा घालण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असून तीव्र स्वरूपाचे निषेध नोंदविण्यात आला. महावितरणचे बिलिंग, वसुली व महसुली कामे कायम कामगार कर्मचारीकडूनच केले पाहीजे, केंद्र व राज्य सरकारच्या धर्तीवर विनाअट पेंशन योजना 1 लाख विद्युत कर्मचारी यांना लागु करावी असे आग्रही प्रतिपादन केले. महावितरण,महानिर्मिती, महापारेषण,तिन्ही कंपनीतील से्वा शर्ती व वेतन एकसारखे करा, संघटनेचे मान्यता गुप्त मतदान घेउन बहुमताने संघटनेस मान्यता देणे आदींचा प्रमुख मागण्यांमध्ये समावेश आहे.
150 प्रतिनिधींचा सहभाग
पूढील टप्प्यात 28 डिसेंबर रोजी प्रकाश गड मुंबई येथील मुख्यालय कार्यालय समोर उत्सफूर्त निदर्शने ,धरणे आंदोलन करण्यात येणार असून तसा निर्धार करण्यात आला. परिमंडल कार्यालय कामगार शाखेचे प्रतिनिधि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांना निवेदन देण्यात आले. आजच्या द्वार सभेत धुळे, नंदुरबार,सर्कल व जळगांव झोन मधील पदाधिकारी उपस्थित होते. संजय सिसोदिया दोंडाईचा,सुधीर पाटील धुळे,अरूण पाटील धुळे , जयसिंह जाधव , विनोद सोनवणे,नितीन पाटील,आर. एस. पाटील,शरद मोरे , संध्या पाटील , सूमारे 150 प्रतिनिधि उपस्थित होते.