पुणे । शहरात डेंग्यू आणि चिकुन गुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हे दोन्ही आजार नियंत्रित करण्यासाठी पालिकेने खाजगी व सार्वजनिक ठिकाणची पाहणी केली. 19 जून ते 17 जुलै दरम्यान पालिकेला खाजगी भागात 7 हजार 744 जागी व 2 हजार 834 सार्वजनिक ठिकाणी डास उत्तपत्तीची स्थाने आढळली. त्यापैकी 3 हजार 709 जणांना नोटीस बजावण्यात आली असून 59 हजार 366 रुपयांचा दंड आकारला आहे.
शहरात जानेवारी महिन्यापासून डेग्यूंचे 53 रुग्ण व चिकुनगुनियाचे 101 रुग्ण आढळले आहेत. पालिकेने 1 लाख 74 हजार 519 खाजगी ठिकाणी फवारणी केली आहे. तर, 49 हजार 793 सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या आजारांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 77, 947 पत्रके वाटली आहेत. तर 90 शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम पार पाडले आहेत. हा आजार फैलवणार्या एडिस इजिप्ती सारख्या डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.