जळगाव: महापालिकेवर असलेल्या हुडकोच्या थकीत कर्जप्रकरणी मनपाची बँक खाती सील करण्यात आली आहे. याबँक खाती सील झाल्याने महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान आज २ जुलै रोजी मुंबई हायकोर्टात याबाबत सुनावणी झाली असता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे मनपाला तूर्त तरी दिलासा मिळालेला नाही. आता पुढील सुनावणी शुक्रवारी ५ रोजी होणार आहे. सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने महापालिकेत आर्थिक आणिबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. बँक खाती सील झाल्याने सध्या प्रशासनाकडून आवश्यक व्यवहार उधारीवर सुरु आहे. पालिकेची सर्व खाती सील असल्याने याचा थेट परिणाम जळगावकरांच्या सुविधांवर होत आहे.
घरकुलसह विविध योजनांसाठी मनपाने १४१ कोटी ३४ लाखाचे मनपाकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची रिसेटींग केल्यानतंर देखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती. याप्रकरणी डीआरटीने ३४१ कोटीची नोटीस मनपाला बजावली. तसेच सप्टेंबर २०१४ मध्ये तब्बल ५० दिवस मनपाचे सर्व बँक खाते सिल केले होते. डीआरटीच्या डिक्री नोटीसला स्थगिती मिळावी, म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.