अकोला । नोटांबदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला ते निर्णय सपशेल चुकला आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद थांबेल, काळापैसा बाहेर येईल प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा होतील असे म्हणणार्यांनी 15 पैसेही जमा केले नाहीत.मोदींचे हेच मुद्दे त्यांना घरी बसवणार आहेत. अशी आश्वासने देऊन 50 दिवस होवूनही सामान्य जनतेच्या रांगा असून,काय परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी सज्ज रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी केले.
मोदींच्या हातात चरखा
स्थानिक स्वराज्य भवन अकोला काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अडीच वर्षांपूर्वी केंद्रात आलेले सरकार सामुदायिक नसून व्यक्तीवादी आहे. मोदींच्या निर्णयाविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नाही. भाजप आणि आरएसएसनेदेखील चुप्पी साधली आहे.शेतकरी, शेतमजुर यांचे हातावर चालणारे पोट आहे. हा वर्ग सरळ कॅश देतो आणि वस्तू विकत घेतो, त्यांना हे कॅशलेश करायला चालले आहेत. मोदी सरकारवर जागोजागी खोटे बोलण्याची पाळी आली आहे. नुकताच खादी ग्रामद्योगच्या कॅलेंडरवरून गांधींजींचा फोटा काढून मोदींच्या हातात चरखा देण्यात आला. प्रसारमाध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला असता, फोटो कधी काढला मला माहीत नाही, असे मोदी खोटे बोलले. कारण पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा फोटो टाकायचा असेल तर पीएमओ कार्यालयाची परवानगी लागते, हे सुद्धा त्यांना माहीत नसावे असा आरोप त्यांनी केला. भाजपची विदेशनिती फोल ठरली आहे.