जळगाव। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटरपर्यंत दारू विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली. त्यामुळे दारू दुकाने बंद झाली. त्याचाच फायदा काही अवैध दारू विक्रेत्यांनी घेण्यास सुरूवात झाली आहे. गुजराल पेट्रोलपंपाजवळ चायनियज खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडीमध्ये ठेऊन देशी दारू विक्री करणार्यावर जिल्हा पेठ पोलिसांनी कारवाई केली आहे.
गुजराल पेट्रोलपंपाजवळ एका चायनीज्च्या गाडीवर दारू विक्री होत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी दिलीप पाटील, जगन सोनवणे, शेखर जोशी, रवी नरवाडे, अजित पाटील, छगन तायडे यांच्यापथकाला पाठविले होता. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ रामकृष्ण संतोष पाटील हा चायनीजच्या गाडीत ठेऊन देशी दारू विकत असल्याचे पोलिसांच्या पथकाला दिले. त्यांनी रामकृष्ण पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 हजार रुपये किमतीचीच्या 36 दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या.