जळगाव : जळगावसह धुळे व नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातून दुचाकी लांबवणार्या अट्टल आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने जळगावच्या रेल्वे स्थानक परीसरातून मुसक्या आवळल्या आहेत. विकास उर्फ विक्की शिवाजी महाले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगांव शहर पोलिस ठाण्यात गुरनं.181/2022, भादंवि कलम 379 या गुन्ह्यात आरोपी विकी महाले वॉण्टेड असल्याने व तो जळगावात आल्याने त्यास गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली. आरोपीला पोलिस खाक्या दाखवताच त्याने जळगाव, धुळे, मालेगांव, नाशिक परीसरातून चोरी केलेल्या 12 वेगवेगळ्या कंपनीच्या अंदाजे दोन लाख 22 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी काढून दिल्या. आरोपीला अधिक तपासकामी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार विजयसिंग पाटील, हवालदार अनिल देशमुख, हवालदार सुधाकर अंभोरे, नाईक राहुल पाटील, नाईक किरण चौधरी, नाईक प्रीतम पाटील, नाईक प्रमोद लाडवंजारी, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.