उल्लेखनिय कार्य कारणारे अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश
जळगाव । महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना उल्लेखनिय काम केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यातील 571 जणांना राष्ट्रपती पदक जाहिर झाला असून महाराष्ट्र दिन मंगळवार 1 मे 2018 रोजी संबंधित जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर देण्यात येणार आहे. खान्देशातून एकुण 27 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला असून त्यात जळगाव जिल्ह्यात 12, धुळे जिल्ह्यात 11 तर नंदुरबार जिल्ह्यातील 4 जणांना हा पदक, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह वरीष्ठांच्या प्रदान करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश
जळगाव जिल्ह्यातून पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ त्र्यंबक सुरळकर, पोउनि ज्ञानेश्वर पाकळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सदाशिव पंजे, चालक सपोनि भिकन गोविंदा सोनार, पो.कॉ. धनराज नामदेव शिंदे, पो.कॉ. वसंत वल्लभ मोरे, पो.कॉ.प्रमोद गंगाधर चौधरी, पो.कॉ. राजेंद्र दिनकरराव पाटील, पो.कॉ.मानिक सोनजी सपकाळे, पो.कॉ. प्रविण प्रल्हाद पाटील, पो.ना. अशरफोद्दीन शेख निजामोद्दिन, पो.ना.महेंद्र राजाराम पाटील यांचा समावेश आहे.
धुळ्यातून 11 तर नंदुरबार जिल्ह्यात 4 जणांना
पो.नि.मंगल देवचंद पुंडकर, राखीव पो.नि.भगवान विजयराव टोणे, राखीव पो.नि.भरत प्रल्हाद चौधरी, पोउनि चुनिलाल त्र्यंबक सैंदाणे, सशस्त्र पोउनि धनराज गंगाधर शेडमाके, सशस्त्र सपोनि विजय संतोष पाटील, सशस्त्र सपोनि रामलाला बबन लोहार, सपोनि राजेंद्र हिरालाल सुर्यवंशी, पो.कॉ.जगन्नाथ सखाराम नेहते, पो.ना. योगेश अशोक सोनवणे आणि पो.ना. निलेश बन्सी पाटील तर नंदूरबार जिल्ह्यातून पोलिस निरीक्षक मेघश्याम दादा दांडगे, पोउनि दिलीप नारायण चौधरी, चालक पोउनि बाळू शंकर जाधव, पो.ना.प्रमोद गुलाबराव सोनवणे यांचा समावेश आहे.