खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गणेश उत्सवाचा आज समारोप

0

जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गणेश उत्सवाचा समारोप आज शनिवारी संध्याकाळी ७ वाजता एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे.

यावेळी केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे हस्ते १० दिवसात संस्थेच्या ज्या शाखांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, त्यांच्या प्रमुखांचा आणि गणपती म्युरल निर्मिती करिता सहकार्य करण्या-या समितीतील प्रमुखांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी केसीई संस्थेचे सदस्य देखील उपस्थित राहतील. गणपती म्युरल पाहण्याचा आज शेवटचा दिवस आहे.