खान्देश सांस्कृतिक विकास संस्थेतर्फे केले वृक्षारोपण

0
पिंपरी-चिंचवड : खान्देश सांस्कृतिक विकास संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण ही विविध प्रकारचा झाडांची जाणिवपुर्वक केलेली लागवड असते. शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढविण्यासाठी मोठया पातळीवर वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. म्हणुनच खान्देश सांस्कृतिक विकास संस्थेने काळाची गरज म्हणुन वृक्षारोपण केले. वृक्षारोपण हे खुप म्हत्वाचे आहे. ऑक्सीजन पातळी दिवसेंदिवस खुप कमी होत चालली आहे. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक घरी, रस्त्याच्याकडेला झाडे लावणे व ती काळजीपुर्वक जगविणे असा संकल्प संस्थेने केला आहे. देवयानी पाटील यांनी संकल्पाबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेंद्र पाटील, देवयानी पाटील आणि लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र महाजन, उपाध्यक्ष मोतीलाल पाटील, मनिषा पाटील, मंगलम राजगोपल, तारे काकू, वीणा शाहददपुरी, बि. शाहददपुरी या सर्वांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. महेंद्र पाटील यांनी पर्यावरणाविषयी माहीती दिली.