नवापूर । नवापूर येथील स्व. एम आर अग्रवाल विकलांगाची सर्वागीण विकास संस्था नवापूर व मैत्रीगृप यांच्या संयुक्त विद्यमाने तिलक निवासी मतिमंद विदयालय खाबदा येथे मुलांना ड्रेस वाटप व वैद्यकीय तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मैत्री गृपव्दारा गरीब, मतिमंद व विकलांग मुलांना मदत करण्यासाठी टाऊन हॉल मध्ये म्युझिकल जर्नी या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. कमल शहा, रुपाली काथावाला, निषा शहा यांनी केले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती होती.
वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधांचे वाटप
नवापूर शहरातील संगीत प्रेमी व दानशुर लोकाच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाला. त्या कार्यक्रमातुन प्राप्त झालेल्या निधीतून मतिमंद गरीब व विकलांग मुलांना मदत करण्याचे आश्वासन मैञी गृपने दिले होते त्याचा एक भाग म्हणून तिलक निवासी मतिमंद विद्यालया मधील मुलांना प्रत्येकी एक ड्रेस व नवापूर डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ कमलेश पाटील व डॉ. विशाल पाटील यांनी सर्व मुलांचे वैद्यकीय तपासणी केली व मैत्री गृपतर्फे या मुलांना मोफत औषधे उपस्थित मान्यवर सी. ए. नरेंद्र अग्रवाल, नगरसेवक विश्वास बडोगे, यश अग्रवाल, प्रा सुनिल अग्रवाल, यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
निधी गोळा करून मतदीचे आश्वासन
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मतिमंद व विकलांग मुले ही देव व साधु संताचे रुप असतात. ही मुले निखालस स्वभावाची व आपल्या दुनियात आनंदी राहणारी असतात म्हणून यांची सेवा करणे म्हणजे प्रभु सेवा करणे होय, असे सांगितले. या नंतर नगरसेवक विश्वास बडोगे यांनी पण विद्यार्थ्यांना विविध मदत देण्याचे सांगितले. तसेच डॉ कमलेश पाटील, व डॉ विशाल पाटील यांनी वैद्यकिय तपासणी नि: शुल्क करण्याचे आश्वासन मुलांच्या पालकांना दिले या नंतर शिक्षिका रायते यांनी समाजाकडुन निधी गोळा करुन मैञी गृपला मदत करण्याचे आश्वासन केले. या वेळी खाबदा गावातील ग्रामस्थ तसेच शाळेचे व्यवस्थापक मंडळ मतिमंद व विक्लांग विद्यार्य्थांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार प्रा. कमल शहा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक मंडळ व आनंद काथावाला, निखिल शहा, जिज्ञेश परिख यांनी विशेष परिश्रम घेतले.