खार करते संकटांवर मात

0

लंडन । माणूस आहे म्हणून चुकतो अशी एक पळवाट माणसांनी शोधली आहे. खारीसारखा प्राणी मात्र एकदा चुकला तर पुन्हा चुकत नाही. याचे कारण आहे खारूताईंची तल्लखता. आपल्यावर ओढावलेल्या समस्येतून बाहेर पडताना खार हा प्राणी मागील समस्यांच्या अनुभवाचा वापर करतो. खारूताई संकटातून बाहेर पडण्याचे तंत्र कधीच विसरत तर नाहीच पण ती नव्या संकटातही ही तंत्रे वापरून त्यांवर मात करते. एक्झेटर विद्यापीठातील संशोधनात आढळून आले आहे की दोन वर्षांनंतरही तेच संकट आले तरी खार त्यातून मागील तंत्र वापरून बाहेर पडते.