खालापूर । खालापुरातील 11 गावांतील शेतकर्यांनी नैना प्रकल्पाला तीव्र विरोध केला असून, शेतकरी संघर्ष समितीने भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष,आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांची भेट घेत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. समितीचे अध्यक्ष राकेश गव्हाणकर, अतिश खेडेकर, उमेश गावंड व शेतकर्यांनी 23 फेब्रुवारी 2018 रोजी पनवेल येथे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांची भेट घेत नैना प्रकल्पाविरोधात निवेदन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.
या मीटिंगमध्ये आमदार, पालकमंत्री आणि सिडकोची एकत्रित मीटिंग लावली असून सिडकोच्या संचालकांना सदर बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे तसेच प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या 60 : 40 प्रस्तावास या आधीच विरोध दर्शवला असून पनवेल तालुक्यातील गावांमध्ये तो वापरण्यात येणार नाही तसेच सदर प्रकल्प कशाप्रकारे अन्यायकारक आहे हे समजून घेत हा प्रकल्प शेतकर्यांचे हित जाणून व त्यांच्या मर्जीनुसार राबवला जात नसल्यास व लोकहिताचा नसल्यास रद्द करणार, असे आश्वासन दिले तसेच माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सदर प्रश्न स्वत: मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच मुख्यमंत्री यांचे सोबत शेतकर्यांची अधिवेशनानंतर मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे, याची शाश्वती दिली.