जळगाव । संसदेच्या विशेष बजेट सेशन आठवड्याभरापूर्वी संपन्न झाले. मात्र विरोधकांनी वारंवार सभागृहात गोंधळ करत सभागृह बंद पाडले. त्यामुळे बजेट सेशनचे कामकाज होऊ शकले नाही. विरोधाचे कोणतेही मुद्दे नसतांना विरोधकांनी वारंवार सभागृह बंद पाडले त्यामुळे अनेक विधेयके व महत्वपूर्ण कामकाज होऊ शकले नाही. हे देशाच्या विकासासाठी घातक असून विरोधकांच्या निषेधार्थ संपूर्ण देशात भाजपच्या खासदारांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. विरोधकांच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. जळगाव शहरात खासदार ए.टी.पाटील यांनी उपोषण केले. दुपारी 4 वाजता त्यांनी लिंबूपाणी प्राशन करुन उपोषण सोडले. खासदार ए.टी.पाटील यांच्यासमवेत आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल आदींनी देखील यात सहभाग घेतला.
यांची होती उपस्थिती
उपोषणाला विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, मनपा विरोधी पक्षनेते वामन खडके, मनपा गटनेते सुनील माळी, जि.प.सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य मधुकर काटे, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दिपक सुर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र घुगे, गजानन जोशी, सुभाष शौचे, बापु ठाकरे, वैशाली पाटील, सरिता नेरकर, वंदना पाटील, मनोज भंडारकर, दत्तु जाधव, डॉ. महेंद्र काबरा, माजी नगराध्यक्ष के.डी.पाटील, नगरसेवक अनिल देशमुख, पृथ्वीराज सोनवणे, नवनाथ दारकुंडे, नितीन पाटील, दिपमाला काळे, अॅड.सुचिता हाडा, पी.के.बलाणी, ज्योती चव्हाण, अश्विन सोनवणे, मंडल वाघ, विनोद मराठे, सुशील हासवाणी, जयश्री पाटील, अशोक राठी, केशव नारखेडे, भगतसिंह निकम, डॉ.धर्मेंद्र पाटील, इरफान नुरी, सुरेश भाट, प्रभाकर तायडे, सुनिल जाधव, सर्जेराव बेडीस्कर, सी.डी पाटील, आशीष वाणी, अशोक लाडवंजारी, प्रविण कुलकर्णी, निलेश झोपे, शिवदास साळंके, दिलीप माहेश्वरी, भगत बलाणी, संजय लुल्ला, डॉ.अभिषेक ठाकुर, ज्योती निंभोरे, पुनम खैरनार, सविता पोळ, जयश्री पाटील, ममता जोशी, रेखा पाटील, आनंद सपकाळे, जितेंद्र चव्हाण, संजय मोरे, धनंजय पाटील, कपिल पाटील, अमित चौधरी, गणेश माळी, बडगुजर आदी उपस्थित होते.
विरोधकांचे आडमुठे धोरण
विरोधकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष तयार असतांना विरोधक चर्चेसाठी तयार नव्हते. इतिहासात पहिल्यांदा बजेट देखील गदारोळात पास करण्यात आला. त्यावर चर्चा देखील झाली नाही. खुद्द देशाच्या पंतप्रधानांना विरोधकांच्या या आडमुठ्यापणाच्या धोरणामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टिका खासदार ए.टी.पाटील यांनी केली.
खासदार रक्षा खडसेंचे उपोषण
भुसावळ । संसदेच्या अर्थसंकल्पीर अधिवेशनात लोकसभेचे कामकाज केवळ 43 तास तर राज्रसभेचे कामकाज 45 तास चालू शकले तसेच दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे तब्बल 248 तास वारा गेले. विरोधी पक्षांच्या आडमुठे धोरण वापरत गोंधळ घालून वेळ वाया घालवल्याने नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी लाक्षणिक एक दिवसाचे निषेध उपोषण केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपोषण केले. रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार चैनसुख संचेती, तालुकाध्रक्ष शैलेश मिरगे व पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी नांदुरा येथे उपोषण केले. काँग्रेसच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी रा उपोषणाला नांदुरावासीरांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.
जनजागृती अभियान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल ते 5 में दरम्यान सरकारची कामगिरी तळागाळातील जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी जनजागृती करणार आहे. शासनातर्फे राबविण्यात येणार्या योजना जनतपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे. आमदार, खासदार त्यांच्या मतदारसंघातील गावांमध्ये जावून शासनाच्या योजनांची माहिती जनतेला देणारआहे.