पिंपरी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली (खेड) रस्ता सहापदरीकरण या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास भाजप सरकार आणि आमदार महेश लांडगे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मान्यता मिळाली आहे. खासदारांनी त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असा पलटवार पिंपरी पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे.
आढळराव शेवटचे खासदार
पवार म्हणाले, कामास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. गडकरी भाजपचे नेते आहेत. आमदार महेश लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. लांडगे या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्यामुळे सहापदरीकरणास मान्यता मिळाली आहे. तसेच कामाचे भुमीपुजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करणार आहे. आढळरावांनी त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ते बिथरले आहेत. शिरुर मतदार संघाचे ते शेवटचे खासदार असणार आहेत. शिवसेना सरकारमध्ये आहे की विरोधात हेच कळत नाही. आढळराव वारंवार सरकारवर टीका करत असतात. मग, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का?
आढळरावांनी घातला होता खो
महापौर नितीन काळजे म्हणाले, आमदार महेश लांडगे तीन वर्षांपूर्वी स्थायी समितीचे सभापती होते. त्यांनी त्यावेळीच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावराचा ’डीपीआर’ तयार केला होता. मात्र, आढळराव यांनी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी मिळवून दिली नाही. त्यासाठी खो घालण्याचे कामच त्यांनी केले. महेशदादांनी आमदार झाल्यानंतर नाशिकफाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावा, यासाठी पाठपुरावा केला
खासदार आरोप करण्यात दंग
गेल्या चार वर्षांपासून गडकरी यांच्याकडे ते पाठपुरावा करत होते. याबाबत गडकरी साहेबांकडे वारंवार बैठका झाल्या. गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अथक पाठपुराव्यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. आढळराव केवळ खोटे-नाटे आरोप करण्यात दंग आहेत