खासदार अमर साबळे यांचा निषेध

0

मुक्ताईनगर । भाजपाचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी जाहीर कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचा संबंध नक्षलवादी संघटनेशी जोडून देशातील आंबेडकरी चळवळीला बदनाम केले आहे तसेच आंबेडकरी चळवळ व आंबेडकरी जनतेचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे आंबेडकरी जनतेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

आंबेडकरी जनतेची माफी मागावी
निवेदनात म्हटले आहे की, आंबेडकरी चळवळ म्हणजे शौर्याचे प्रतीक असून आंबेडकरी चळवळ अन्यायाविरूध्द लढण्याची ऊर्जा आहे परंतु मनूवादी, विकृत मानसिक वृत्ती सतत आंबेडकरी जनता व आंबेडकरी चळवळींना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात. तसाच प्रयत्न खासदार साबळे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे मात्र आंबेडकरी जनतेचा अपमान झाला आहे. अशा मानसिकदृष्ट्या विकृत असलेल्या एका जबाबदार पक्षाच्या खासदाराने असे बेजबाबदार विधान करणे अतिशय निंदनीय बाब आहे. त्या वक्तव्याचा व खासदार साबळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच आंबेडकरी जनतेची माफी मागावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर माजी सभापती संतोष बोदडे, आर.के.गणेश, राजू बोदडे, मनोहर खैरनार, विशाल सोनोने, रवींद्र बोदडे, अरुण मोरे, सिध्दार्थ बोदडे, पंकज घुले, प्रमोद भालेराव, विनोद घुले, समाधान गवई, जे.आर.बोदडे, दीपक धुंदले, सुधाकर बोदडे, अनिल बोदडे, महेंद्र उमाळे, कपील बोदडे यांच्या स्वाक्षर्‍या आहे.