शहादा-खासदार डॉ.हिना गावीत यांनी दत्तक घेतलेल्या शहादा तालुक्यातील कहाटुळ येथील गावात अतिसारची जोरदार साथ सुरु आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा व ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आले आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दाखल झाली आहे. या लागन मध्ये करन घनश्याम सोनवणे या दहा वर्षाचा मुलाचा मृत्यु झाला आहे. तर ४५ जणांवर उपचार सुरु आहेत.
गेल्या एक महिन्यापासुन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याना गळती लागली होती परिणामी गावात अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता ग्रामपंचायतीने पुर्णतः दुर्लक्ष केले होते. पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्घंधी येत होती. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी अनेकाना संडास उलट्या व्हायला सुरुवात झाली. लागण झालेल्या रुग्णाना कहाटुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु केले . मात्र साथ आटोक्यात येत नाही पाहुन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बोलवण्यात आली चार वैद्यकीय अधिकारी १७ आरोग्य कर्मचारी उपचार करीत आहे.
स्वत जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रभारी मुख्य जि प कार्यकारी अधिकारी सोमवंशी कहाटुळ गावातच तळ ठोकुन आहे. पाण्याचा टाकीसह ठिकठिकाणी जंतुनाशक टी सी एल पावडर टाकण्यात आले. प्रांताधिकारी साताळकर तहसिलदार मनोज खैरनार हे लक्ष ठेवुन आहेत . गावात साथ आटोक्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पेंढारकर यांनी दिली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार उदेसिंग पाडवी ,सातपुडा साखर कारखाना चेअरमन दिपक पाटील, जि.प.सदस्य अभिजित पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.किशोर पाटील, रविद्र रावल यांनी भेट देवुन रुग्णांची विचारपुस केली . आमदार उदेसिंग पाडवी यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.