खासदार बारणे यांच्या पुढाकाराने शिवसेना पदाधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर

0

शिवसेना पदाधिकार्‍यांसाठी आज प्रशिक्षण शिबिर
खासदार संजय राऊत करणार मार्गदर्शन

वडगाव मावळ- पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून लोणावळा येथील कुमार रिर्साटमध्ये शुक्रवारी (दि.15) शिवसेना पदाधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तर, या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थित होणार आहे. या शिबिरासाठी आमदार मनोहर भोईर, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, रायगड जिल्हा महिला संघटीका रेखा ठाकरे, रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख शोरी पेंडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतिल पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर मार्गदर्शन करण्यात येईल. सकाळच्या सत्रात शशांक मोहिते यांचे ‘वक्ता प्रशिक्षण’ शिबिर या विषयावर मार्गदर्शन होणार असुन दुपारच्या सत्रात दिपक शेंडे यांचे ‘निवडणूक व बुथ व्यवस्थापन’ व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे ‘मी भगवा फडकवणारच’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त शिबिर
याबाबत बोलताना खासदार बारणे म्हणाले की, ही निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रात युतीमध्ये काम करत होतो म्हणून भाजप-सेना युतीचे राज्य आले. मात्र आता भाजपवाले चुकीची कामे करीत आहेत. निवडणूक एकटे लढविणार याबाबत शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे हे आपले विचार व्यक्त करीत असतात. असे जर एकटे लढावे लागले तर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.