खासदार रक्षा खडसेंबाबतही ती पोस्ट निराधार -माजी मंत्री एकनाथराव खडसे

0

सर्वेत 56 टक्के मतदारांनी दाखवला विश्वास ; मुक्ताईनगर विधानसभेत 51 टक्के मतदारांची नाथाभाऊंना पसंती

मुक्ताईनगर- भाजपने आमदार, खासदारांचा त्यांच्या मतदारसंघात निवडून येण्याच्या सद्यस्थितीबाबतचा खासगी संस्थेकडून केलेल्या सर्वेनंतर रीपोर्ट कार्ड मुंबईतील बैठकीत भाजप आमदार, खासदारांना बंद लिफाफ्यात देण्यात आले होते मात्र 11 ऑक्टोबरला सकाळपासून रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम पसरवणारी माहिती व्हायरल झाली मात्र ती पोस्ट निराधार असल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे झालेल्या पत्रकार परीषदेत केला. ते म्हणाले की, सर्वेमध्ये 56 टक्के मतदारांनी रक्षा यांच्यावर तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात 51 टक्के मतदारांनी आपल्यावर विश्‍वास दर्शवला आहे. मुक्ताईनगरातील भाजप कार्यालयात गुरूवारी पत्रकार परीषद झाली. प्रसंगी खडसे बोलत हाते.

सातव्यांदा निवडून येणे ही आपल्या कामाची पावती
खडसे म्हणाले की सर्वेतील रीपोर्ट कार्डनुसार रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत काही ठिकाणी संभ्रम पसरवणारी माहिती व्हायरल झाली. हा प्रकार निराधार व दिशाभूल करणारा आहे. उलट 56 टक्के मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यावेळी त्यांनी बंद लिफाफ्यातील अहवाल उघड करून खासदार खडसे यांच्या नावाला 56 टक्के पसंती असल्याचा दावा केला. रीपोर्ट कार्डमध्ये 38 टक्के मतदार खासदार खडसे यांच्या कामकाजावर संतुष्ट, 16 टक्के समाधानी आणि 2 टक्के लोकांनी पुन्हा संधी द्यावी (एकूण 56 टक्के) असे मत नोंदवले. तर 35 टक्के लोकांनी बदल पाहिजे व 9 टक्के लोकांनी माहिती नाही, असा पर्याय सर्वेत निवडल्याचे आमदार खडसे म्हणाले. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातदेखील 51 टक्के पसंती आपल्या नावाला मिळाली आहे. सलग सात वेळा निवडून आल्याने मतदार संघातील जनतेने माझ्या कार्याची पावती दिल्याची भावना आमदार खडसेंनी व्यक्त केली. पत्रकार परीषदेला निवृत्ती पाटील, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, विलास धायडे, प्रवीण पाटील, सतीश चौधरी उपस्थित होते.