खासदार रक्षा खडसेंसह शिष्टमंडळ अमेरीकेला रवाना

0

विविध प्रकल्पांना भेटी देत घेतली तंत्रज्ञानाची माहिती

भुसावळ- रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील शेतीच्या विकासासाठी वाहून घेतलेल्या उद्योजक आणि लोकप्रनिधींचे शिष्टमंडळ नुकतेच अमेरीकेत रवाना झाले. जॉर्जीया इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका येथे उभयंतांना आमंत्रण देण्यात आले होते. शेतीची उत्पादकता व गुणवत्त वाढवणे, पाणी व्यवस्थापन तसेच संकरीत बियाणेनिर्मिती बरोबरच फळबागांसाठी योग्य खुंटाच्या निवडीबाबत संशोधन तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब आदींचा शिष्टमंडळ अभ्यास करणार आहे.

या प्रतिनिधींचा मंडळा समावेश
उत्तर महाराष्ट्रातून खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार भाई जगताप, सांडू ब्रदर्सचे संचालक शशांक भास्कर सांडू, हिरवाल ग्रुपचे संचालक किशोर धारिया, रोज 10 टन भाजीपाला अमेरिकेत पाठवणार्‍या श्री स्वामी समर्थ एअरफ्राईट कंपनीचे संचालक श्रीकृष्णा परब, सर्वात जास्त आंबा परदेशात निर्यात करणारे ग्लोबल कोकणचे संचालक संजय यादव, भागीरथी ट्रान्सकॅर्पोफचे संचालक मनोहर संकपाळ, वर्धमान शुगर फॅक्टरीचे संचालक धैर्यशील कदम अशा विविध मान्यवतरांचा समावेश या शिष्टमंडळात आहे.

विविध विभागांना भेटी
14 रोजी प्रतिनिधी मिसीसीला पोहोचल्यानंतर त्यांनी 15 रोजी मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीला भेट दिली तर 16 रोजी विजय सिंघ यांच्याकडे आयोजित बैठकीला उपस्थिती दिली. 17 रोजी अटलांटा येथे जाताना बॉटलींग फॅक्टरीला भेट, अटलांटा येथे वाणिज्य दूतावसाला भेट देऊन वाणिज्य दूतावासातील जनरल यांच्यासोबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 18 रोजी जार्जीया आर्थिक विकास विभाग यांच्याकडून आयोजित बैठकीला उपस्थिती देण्यात येणार असून 19 रोजी लॉजीस्टिक कंपनीला भेट तर 20 ‘व्यवसायाच्या संधी’ या विषयावर बैठकीला हजेरी, 21 रोजी जार्जीया आर्थिक विकास विभाग यांच्याकडून आयोजित बैठकीला उपस्थिती, 22 रोजी कोलंबिया साऊथ कॅरोलिना येथील वाणिज्य दूतावास येथील विविध बैठका व चर्चासत्रांना उपस्थिती तर 23 रोजी शिष्टमंडळ भारताकडे प्रवासासाठी प्रयाण करणारत असल्याचे स्वीय सहाय्यक गणेश ढोले यांनी कळवले आहे.