पिंपरी : खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या कामकाजा संदर्भात त्यांचे अनुभव व काही संसद सदस्यांचे मनोगत पुस्तकामध्ये साकारले असून एकूणच संसदेच्या कामकाजा बाबत मी अनुभवलेली संसद हे पुस्तक लिहीले आहे या पुस्तकाचे प्रकाशन गुरूवार दि 3 जानेवारी 2019 रोजी कन्स्टीट्युशन क्लब दिल्ली येथे सायं 4 वा लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री अनंत गिते, हंसराज आहिर, शिवसेना नेते संजय राऊत, आनंदराव अडसुळ उपस्थित राहणार आहे.
हे देखील वाचा
खासदार श्रीरंग बारणे पहिल्यांदाच मावळ लोकसभा मतदार संघातून 2014 साली लोकसभेत निवडून गेले या आगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वीस वर्षाचा अनुभव त्यांना होता लोकसभेतील त्यांचे काम अतिशय प्रभावी राहिले आहे. अनेक प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडले संसदेतील चांगल्या कामाबद्दल त्यांना चेन्नई येथील प्राईम पाँईट फांउडेशन यांच्या वतीने सलग चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संसदेतील त्यांचे अनुभव संसदेच्या कामाविषयी माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यादृष्टीकोनातुन त्यानी मी अनुभवलेली संसद हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी प्रस्तावना दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभापती सुमित्रा महाजन, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभसंदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री व संसद सदस्य असे 19 जणांनी आपले अनुभव या पुस्तकाला दिले आहेत. यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी शब्दवेध , समर्थ लढवय्या, व माझा वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ ही पुस्तके प्रकाशित केली असून एकूणच हे पुस्तक संसदीय कामकाजाचा ठेवा ठरेल असे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.