खिर्डी : देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला आहे. अशा कठीण प्रसंगी कुठलीही खरेदी न करता अत्यंत साधे पद्धत्तीने ईद साजरी करण्याचा निर्णय खिर्डीतील मुस्लीम बांधवांनी केला आहे. खिर्डी येथील समस्त मुस्लिम बांधव यंदा साध्या पद्धतीने तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ईदच्या शुभेच्छा देणार आहेत शिवाय ईद सणात समस्त मुस्लिम बांधव जे नवीन कपडे, बुट-चप्पल तसेच शिर खुर्म्याचे साहित्य आदी खरेदी करतात ते टाळून त्या ऐवजी गोर-गरीबांना मदत केली जाणार आहे.
खिर्डीकरांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
देश आनंदात तर आम्ही आनंदात याच गोष्टीला समोर ठेवून यंदा येणार्या ईद मध्ये जे काही खरेदीसाठी पैसे खर्च होतात ते न करता गोरगरीबांना मदत करूनच या वेळी ईद साजरी करण्याचा खिर्डी खुर्द व बुद्रुक येथील राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी व समस्त मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला आहे.