खिर्डीत अवैधरीत्या दारू विक्रेत्यास अटक

0

खिर्डी बु.॥- अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या संतोष यशवंत इंगळे यास पोलीस पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार 446 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष फौजदार जिजाबराव पाटील, किरण चाटे तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार भास्कर कुलकर्णी, शेख असलूद यांनी कारवाई केली.