खिर्डी: गावातील भास्कर विठ्ठल पाटील यांच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी घरफोडी करीत 50 हजार रुपये रोख व तीन लाख रुपय किंमतीचे सोन्याचे दागिने मिळनू साडेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याने मोठी खळबळ उडाली.
बंद घराला केले टार्गेट
खिर्डी येथील भास्कर पाटील हे आपल्या परीवारासोबत बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. घराच्या मागच्या बाजुने घरात प्रवेश करून दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून 50 हजारांची रोकड व तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. घरफोडीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, निंभोर्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी घटनास्थळी माहिती जाणून घेतली. भास्कर पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.