खिर्डी : गावातील स्वस्त धान्य दुकानात शिस्तबद्ध पद्धतीने मोफत तांदूळ वाटप करण्यात आला. रेशन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्यवर्गातील घटकातील लाभार्थींना मोफत तांदूळ घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टनसिंग च्या नियमानुसार रांगेत लागून तांदूळ घेतले. तसेच स्वस्त रेशनदुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील यांच्याकडून प्रत्येक लाभार्थ्यांना मास्क व सॅनिटाईजरचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्त्तिी
या प्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील, मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी एफ.एस.खान, खिर्डी खुर्द सरपंच ज्योती कोळी, ग्रामसेवक जी.टी.सोनवणे, पोलिस पाटील प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ बढे, रमेश कोळी, अनंता कोळी, अंगणवाडी सेविका वंदना पाटील, मालतीबाई महाजन, दीपाली चौधरी आदी उपस्थित होते.