खिर्डी : निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या खिर्डी खुर्द आरोग्य उपकेंद्राची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात दैनिक जनशक्ति मध्ये या बाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती. याची दखल घेत पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंन्द्राची पाहणी केली. न आरोग्य विभांगाशी व डॉक्टरांशी संपर्क साधून विचारपूस करून या उपकेंद्राचे काम लवकरात लवकर करण्यात यावे व काही गरज भासल्यास लोकप्रतिनिधी म्ळणून सेवेत हजर राहणार असल्याचे दीपक पाटील म्हणाले व ही इमारत लोडबेरींगची असून इमारतीला जवळपास 25 ते 30 वर्षे झाले असून इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असल्याने पावसाळ्याआधीच इमारतीचे नूतनीकरण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. इमारतीच्या भिंतीला जागोजागी तडे तसेच फरशा उखडल्या असल्याचे दिसून आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, आरोग्य सेविका डॉ.आर.एम.खाचणे, आरोग्य सेवक डॉ.चंदन पाटील, मदतनीस पल्लवी पाटील, सतीश फेगडे, नईम बेग, ललित पाटील, गणेश बोरणारे आदी उपस्थित होते.