खिर्डी। मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असुन खिर्डी खुर्द येथिल साडे तीन वर्षाच्या मुलीने रोजा मंगळवार 6 रोजी ठेवला होता या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खिर्डी खुर्द येथे साडे तीन वर्षाची अलीजा बी शेख.फरीद हिने आई वडीलाकडेे हट्ट धरत पवित्र रमजान महिन्याचा हा नववा रोजा तिने उपवास केला असुन आज आपल्या जीवनातला पहिला उपवास म्हणून तो मनोभावे श्रद्धेने पूर्ण केला आहे.अलीजा ने रोज़ा सहेरी सकाळी 4.27 ते इफ्तार 7 वाजेच्या कालावधीत कोणतेही अन्न, पाणी, न खाता- पिता उन्हाळ्याच्या वेळेवर ही रोजा पूर्ण केला. तिचे वडिलांनी तिला दुपारी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी तिने यास नकारून दिले. गावातील हिंदु- मुस्लिम बांधवामध्ये ह्या मुलीचे कौतुक होत आहे आणि परमेश्वरसाठी कोणतेही केलेले व्रत पूजा श्रद्धेने केले तर पूर्ण होतेच असे आज अलीजाने करुन दाखवले आहे.