मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या दिवशी त्याच्यावर मित्रपरिवारासोबतच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. अक्षय कुमारला एक खास भेट मिळाले आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या यादीनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी म्हणून अक्षयच्या नावे शिक्कामोर्तब झालं आहे.
‘गोल्ड’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्यावेळी अक्षय कुमार १४ भारतीय भाषांमधील मुख्य १२५ वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. ‘अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार अक्षय ८७ गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला.