‘खिळ्यां’चे आगळेवेगळे प्रदर्शन

0

चिंचवडगाव : खिळेमुक्त आणि आळेयुक्त झाडे अशा उपक्रमातून मागील काही महिन्यांपासून अनेक झाडांना या त्रासातून मुक्त केले आहे. शेकडो झाडांची खिळे, तारा, लोखंडी अँगल्स काढण्यात आले आहेत. आंघोळीची गोळी आणि इतर संस्था तसेच नगरसेविकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या 15 आठवड्यामध्ये साचलेल्या खिळ्यांचे आगळेवेगळे प्रदर्शन कनेक्टिंग एनजीओ पीसीएमसी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने भरविण्यात आले. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील जिजाऊ पर्यटन केंद्रात भरलेल्या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला.

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे समन्वयक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. उपक्रमाविषयी पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनी माहिती दिली.