खुनाच्या गुन्ह्यात पोलीसांचा संथगतीने तपास

0

भुसावळ। तालुक्यातील निंभोरा- पिंप्रीसेकम संयुक्त ग्रामपंचायतीचे सरपंच शालीक सोनवणे यांचा मृतदेह 19 जून रोजी फेकरी उड्डाणपुलाखाली सापडला होता. काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाला पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केली होती.या चौकशी करून खुन कश्यामुळे झाला याचा तपास लागला नाही. या खुनाचा तपास करण्यासाठी किती दिसव लागणार असे प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चौकशीत काय हाती लागले?
25 जूनरोजी रात्री 10 आरोपींनी भुसावळ शहरातील भारतनगर परिसरात गोळीबार करुन दोन भावांना जखमी केले होते. 10 दिवसात पोलीसांनी दहशत माजविणार्‍या या आरोपींना शोधून 7 आरोपी ताब्यात घेतले आहे. मात्र, सरपंच हत्याकांडाच्या तपासात प्रगती झालेली नाही पोलीसांनी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तायडे यांची चौकशी केली होती. पोलीसांना तायडे यांच्यावर संशय असल्यामुळे त्यांनी त्यांची वारंवार चौकशी केली होती. मात्र यात काय मुद्दे पोलीसांच्या हाती लागले ते मात्र सांगितले जात नाही. त्यामुळे याबाबत गावकर्‍यांना शंका येत आहे.

20 दिवसांपासून सरपंच मृत्यूचा तपास पोलीसांकडून संथगतीने सुरु आहे. भुसावळ शहरात गोळीबार करणार्‍या आरोपींसाठी पोलीसांचा फौजफाटा लावून आरोपींना शोधण्याचे कार्य केले. सरपंचाच्या खुनाचा गुन्हा पोलीस स्थानकात दाखल केलेला नाही. फक्त अकस्मात मृत्यूच्या नोंदीवर थांबून संथगतीने तपास सुरु आहे. सरपंचांचे शवविच्छेदन धुळे रुग्णालयात करण्यात आले होते. त्यानंतर गोषवारा नाशिक लॅबोरेटीत पाठवूनही खुन आहे की अकस्मात मृत्यू ?; त्याचे कारणसुध्द्ा नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पोेलीसांकडे आले की नाही? याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकार्‍यांकडून मिळत नसल्यामुळे शहरात व ग्रामीण परिसरात पोलिसांच्या भूमिकेची चर्चा होत आहे. पोलीसांनी गावातील राजकीय पदाधिकार्‍यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.