भुसावळ : भांडणाच्या वादातून तक्रारदारास चाकूने मारहाण करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना 16 ऑगस्ट 2020 रोजी शहरातील मणियार कॉलनीत घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही संशयीतांना अटक करण्यात आली असलीतरी अन्य संशयीत पसार असल्याने त्यांच्याबाबात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना शुक्रवारी मुस्लीम कॉलनी भागातून अटक करण्यात आली. शेख फईम शेख जैनुद्दीन (33) व शेख शेफुउद्दीन शेख जेनुद्दीन (45, दोहे रा..मणियार कॉलनीजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बाजारपेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
तक्रारदार शेख नाजीस शेख नासिर (रा.मणियार कॉलनी, भुसावळ) यांना 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता पाईप लाईनमध्ये विटा टाकण्याच्या कारणावरून चाकूने व लोखंडी रॉड ने तसेच लाकडी काठयाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्य आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असलीतरी दोन आरोपी पसार असल्यांचा त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी आरोपी जाम मोहल्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करयात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे आदींनीही कारवाई केली.