भुसावळ: तालुक्यातील हतनूर येथे विश्वनाथ तापीराम सपकाळे यांचा 16 नोव्हेंबर 2012 रोजी खून झाला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी सुनील विठ्ठल बाविस्कर, विठ्ठल नारायण बाविस्कर व कमलबाई विठ्ठल बाविस्कर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता. भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात 11 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींतर्फे अॅड.महेश आर.भोकरीकर व अॅड.अनिल मोरे, अॅड.विवेक आवारे यांनी काम पहिले.