जळगाव । शहरातील रिंग रोडवरील राजस हॉस्पिटलमधील कर्मचार्याने 6 मे 2016 रोजी पत्नी आणि मुलीचा खून केला होता. या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयीताने न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात जामीनासाठी दाखल केला होता. तो शनिवारी न्या. दरेकर यांनी फेटाळून लावला आहे. राजस हॉस्पिटलचा कर्मचारी सचिन गुमानसिंग जाधव याने एक वर्षापुर्वी 6 मे रोजी त्याची पत्नी सविता उर्फ कल्पना सचिन जाधव आणि मुलगी रिया उर्फ रिनाक्षी सचिन जाधव यांचा इंजेक्शन देऊन खून केला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांचा केटामाईनमुळेच मृत्यू
त्यात पोलिसांनी 11 मे 2016 रोजी त्याला अटक केली होती. त्यामुळे तो कारागृहातच आहे. दरम्यान, त्याने न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या यायालयात जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर शनिवारी कामकाम होवून न्या. दरेकर यांनी तो अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. या खून प्रकरणात फॉरेन्सिक लॅबचा अहवाल काही दिवसांपुर्वी आला आहे. त्यात सविता उर्फ कल्पना जाधव आणि रिया उर्फ रिनाक्षी जाधव यांचा केटामाइनमुळे मृत्यू झाल्याचे अहवाल पोलिसांना मिळाला आहे.