खुनातील संशयीतांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता

0

जळगाव। शेताच्या बांधावरून वाद होवून झालेल्या मारहाणीत एकचा मृत्यू झाल्याची घटना सांगवी ता़ पाचोरा येथे घडली होती़ या खटल्यात संशयीतांविरूध्द कोणताही सबळ पुरावा न आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आज 11 एप्रिल रोजी न्या. के.पी.नांदेडकर यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.

पाचोरा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी संशयीत गजानन तेली, रमेश तेली, नारायण तेली, देवानंद तेली, कोमल तेली, हरी तेली, यांनी शेताच्या सामाईक बांधावरून ट्रकचे उकरलेली दगडे फिर्यादीच्या शेतात पडल्याने ते उचलण्याच्या कारणावरून मयत ताराचंद तेली व अमोल तेली यांना शेतात लोखंडी कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत ताराचंद यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज न्य.नांदेडकर यांच्या कोर्टात सुरू होते. सदर खटल्यात एकुण 8 साक्षीदार तपासण्यात आले. संशयीतांविरूध्द कोणताही सबळपुरावा सादर न झाल्याने सर्व संशयीतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.