दापोडी : रविवारी पहाटे कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अभिषेक चव्हाण (वय 26), रुपेश संकपाळ (वय 20), राहुल वीर (वय 20), सनी गजभीव (वय 20, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अल्विन राजगोपाल (वय 19, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रॉबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली. निखील हा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आरोपींनी भांडणाच्या कारणावरून अल्विनवर वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या क्लेहरा आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले.