खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

0

* स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
* कजगाव येथून घेतले ताब्यात
जळगाव – रामानंद नगर पोलीसात खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. रविसिंग मायासिंग बावरी (वय-24) आणि मालाबाई मायासिंग बावरी (वय-60) हे दोन्ही आरोपींची नावे आहे. रामानंद नगर पोलीसात भाग -5 गुरनं. भादवी क्रमांक 302,143, 147, 148, 149, 504 प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल घडल्यापासून दोघे आरोपी फरार होते. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे येत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली त्यानुसार सापळा रचत रविसिंग मायासिंग बावरी आणि मालाबाई मायासिंग बावरी संशयीत आरोपींना अटक केली.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि सुनिल कुराडे यांच्या आदेशानुसार सपोनी महेश जानकर, पोना. रविंद्र पाटील, पोहेकॉ विनोद पाटील, रामकृष्ण पाटील, अनिल देशमुख, दिपक पाटील यांनी कारवाई केली.