खूनातील संशयितास 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। राजीव गांधी नगरातील राहुल प्रल्हाद सकट या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य संशयीत सराईत गुन्हेगार असलेल्या सत्यासिंग मायासिंग बावरी याला शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यास आज न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले त्याला 21 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राहुल सकट यांच्यावर बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चॉपरने हल्ला केल्यानंतर सत्यासिंग फरार झालेला होता. या प्रकरणात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सत्यासिंग याच्यासह रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मलिंगसिंग मायासिंग बावरी, मालाबाई सत्यासिंग बावरी, कालीबाई सत्यासिंग बावरी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. तर जखमी राहुल सकट याला मुंबईला उपचारासाठी नेत असताना नाशिकजवळ त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कलमात बदल होवून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शनिवारी खुनातील मुख्य संशयित सत्यासिंगचा रामानंदनगर पोलिस शोध घेत असतांना तो रेल्वेस्टेशन परिसरात मिळून आला होता. दरम्यान, आज रविवारी त्याला न्या. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता 21 जुलेैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.