खेडगाव पंचक्रोशीसाठी मंत्रालयात लवकर बैठक

0

चाळीसगाव। जलयुक्त शिवार योजने अंतर्गत गाळमुक्त धरणे आणि जलयुक्त शिवार या योजनेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यात एक दिवसाचा दौरा आयोजित केला होता. या दौर्‍यात चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी खेडगाव पंचक्रोशी विकास मंचच्या वतीने सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची माहिती जाणून घेतली.

विकास मंचतर्फे जन सुविधा केंद्राचे उद्घाटन
यावेळी खेडगाव पंचक्रोशीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जन सुविधा केंद्राचे उद्घाटन ना. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खेडगाव पंचक्रोशी विकास मंचचे प्रफुल्लकुमार साळुंखे, भाजप तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे उपस्थित होते. खेडगाव पंचक्रोशीत येणार्‍या खेडगाव, खेडी, पोहरे, अडळसे, डस्केबर्डी, कलमडू या गावांसाठी दीड कोटी रुपयांच्या साखळी बंधारे आणि खोलीकरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली. या पंचक्रोशीतल्या गावातील गावकर्‍यांची मंत्रालयात बैठक घेऊन खेडगाव, खेडी आणि कलमडू येथे तलावांच पुनर्जीवन करण्याबाबत निर्णय घेणार असे आश्वासन ना. शिंदे यांनी दिले. यावेळी माजी सरपंच देविदास साळुंखे, संदीप साळुंखे, संजय साळुंखे, विवेक साळुंखे, तुकाराम साळुंखे, सुनील महाजन, पंडित उर्फ बंडू साळुंखे, शबिर पिंजांरी , बाबा अहीरराव, राहुल साळूंखे, अंकुश महाजन, भूषण साळुंखे, योगेश साळुंखे, रमेश वाणी, हर्षल साळुंखे, निलेश साळुंखे, किशोर रावते, सचिन साळुंखे, आबा मिस्तरी, कैलास सोनवणे, रावसाहेब साळुंखे, पप्पु साळुंखे आदी उपस्थित होते.