डॉ. शैलेश मोहिते यांचा पुढाकार
चाकण : वादळी पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.
मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील महादेश विठ्ठल कराळे, गणपत बबन रौंधळ, दत्ता राजू घटमाळे या तीन शेतकरी कुटुंबांच्या घरावरील पत्रे शंभर फुटांपर्यंत उडून गेले होते. त्यामध्ये त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती गावातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निमगाव येथील संबंधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची रोख मदत दिली आहे. यावेळी डॉ. शैलेश मोहिते, अमर शिंदे, बबन शिंदे, सखाराम मावळे, संतोष शिंदे, भाऊसाहेब तांबे, नारायण तांबे काळूराम वायकर आदी उपस्थित होते.