चाकण : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील 16 ग्रामपंचायत कार्यालयांना नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. ग्रामीण भागासाठी पायाभुत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणार्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन 1 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणार्या व स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःचे हक्काचे कार्यालय मिळण्यासाठी शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत खेड तालुक्याला पूर्वी दहा आणि आता मौजे आहिरे, आसखेड एकलहरे, वराळे आणि परसुल अशा 6 ग्रामपंचायत कार्यालयांना नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. सदर योजनेंतर्गत खेड तालुक्यात एकूण 16 ग्रामपंचायत कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे, अशी माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली.