पारोळा- राष्ट्रीय महामार्गावर खेडीजवळ मोटारसायकल घसरल्याने अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली. जळगाव येथील खेडी बु परिसरात राहणारे विश्वास तुकाराम पाटील आणि योगेश किशोर पाटील हे मोटारसायकलने (एम एच 19 डी.एफ 6333) ने धुळ्याजवळ शेतीच्या कामासाठी जात होते. दुपारी दीड वाजता सहा बोळे फाट्याजवळ त्यांच्या वाहनास एका मोठ्या वाहनाने ओव्हरटेक केले. त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले. यामुळे मोटारसायकल रस्त्याच्या पलीकडे जावून घसरली. या अपघातामध्ये विश्वास तुकाराम पाटील यांना डोक्यास जबर मार लागला, तर योगेश पाटील हे देखील गंभीर जखमी झाले. यानंतर दोघांना दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, विश्वास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मोटर सायकल चालक योगेश किशोर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.