अध्यक्षपदी दत्ता भालेराव; तर सचिवपदी रुपेश बुट्टे
चाकण : खेड तालुका पत्रकार संघाची 2018 या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया रविवारी (दि.11) राजगुरुनगर येथील खेड पंचायत समितीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडली. यासाठी राजेंद्र सांडभोर, अविनाश दुधवडे, कोंडीभाऊ पाचारणे, विद्याधर साळवे आदींसह तुकाराम बोंबले, महेंद्र शिंदे, निवृत्ती नाईकरे, सुनील थिगळे, एम.डी.पाखरे, रामचंद्र सोनवणे, नाजीम इनामदार, वनिता कोरे, ए.पी. शेख, संदीप मिरजे, सदाशिव अमराळे, अशोक कडलक, बाळासाहेब सांडभोर, राजेंद्र लोथे, इसाक मुलानी, राजेंद्र मांजरे, कुंडलिक वाळुंज, किरण खुडे, भानुदास पर्हाड आदी सदस्य उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष नंदकुमार मांदळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. प्रास्ताविक सुनील थिगळे यांनी केले, सूत्रसंचालन अविनाश दुधवडे यांनी केले, तर आदेश टोपे यांनी आभार मानले.
नूतन कार्यकारणी याप्रमाणे : दत्तात्रेय भालेराव (अध्यक्ष), राजेंद्र लोथे (कार्याध्यक्ष), भानुदास पर्हाड (सहकार्याध्यक्ष), रुपेश बुट्टे (सचिव), अशोक टिळेकर (सहसचिव), चंद्रकांत मांडेकर, राजेंद्र मांजरे, गणेश फलके (उपाध्यक्ष), कुंडलिक वाळुंज (खजिनदार), शरद भोसले (सहखजिनदार), संजय शेटे (प्रसिद्धी प्रमुख), सुनील ओव्हाळ (कायदेशीर सल्लागार), अविनाश दुधवडे, नंदकुमार मांदळे, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, विद्याधर साळवे (सल्लागार).