खेड तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी विद्या मोहिते

0

आळंदी : खेड तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी विद्या मोहिते यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष माजी आदर्श सरपंच शशिकांत मोरे यांनी दिली. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती व नियुक्ती पत्र प्रदान करण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष माजी आदर्श सरपंच शशिकांत मोरे होते. याप्रसंगी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, राज्य संघटक कैलास गोरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, वेल्हा पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर, आदर्श सरपंच भाऊ मरगळे, शिरूर तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड, उद्योजक संजय खैरे, सरपंच विद्या मोहिते, सुनील साबळे, वामनराव शिवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज मोरे, बजरंग साबळे, विवेक मोहिते, धिरज मोरे उपस्थित होते. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरपंचांना असणारे अधिकार व कर्तव्य याविषयावर मार्गदर्शन केले.

सरपंचांना राज्याच्या विकासाचा मुलभूत घटक मानला जातो. प्रशासकीय कार्य जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सरपंच हाच विकासाचा पाया असल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी पुणे जिल्ह्यात लवकरच सरपंचांचा जिल्हास्तरावर मेळावा आयोजीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक सरपंच गावच्या विकासासाठी बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून सरपंचाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खेड तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी विद्या मोहिते यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक शशिकांत मोरे यांनी केले.सूत्रसंचालन आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांनी केले.