चिंबळी : खेड तालुक्यात ग्रामीण भागात चिंबळी, कुरुळी, मोई, निघोज, केळगांव, मरकळ आदी परिसरातील गावांमध्ये गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा नंतर मंगळवारी प्रत्येक घरोघरी गौरीचे आगमन झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने गेल्या दहा वर्षांपासून चिंबळी येथील कमल बहिरट व त्यांच्या सुना अंकुरा, अर्चना व राणी यांनी गौरयांच्या मूर्तीची विद्युत रोषणाईत प्राणप्रतिष्ठा करून विविध प्रकारची फळे व फराळाचे पदार्थ मांडून गौरींना अलकांरानी सजवून विविध प्रकारचे खेळणी मांडून पंचपक्वानाचे जेवण ठेवून 16 दिवांची आरती करून हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.