खेड पोलीस कोठडीतील आरोपी पलायन प्रकरणी गार्ड कमांडर निलंबित !

0

पुणे : सोमवारी रात्री पोलीस झोपले असल्याचा फायदा घेत खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून दोन आरोपींनी पळ काढली. हे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

सोमवार पहाटे ४ वाजेच्या सुमारास विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या दोन आरोपींनी कोठडीच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून पोबारा केला.त्यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस असूनही आरोपी गज कसे तोडू शकले असा प्रश्न विचारला जात होता. या प्रकारामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर टीकाही करण्यात येत होती.अखेर या प्रकरणात गार्ड कमांडर कैलास कड यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर इतर तीन कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस झोपलेले असतांना खेड पोलीस कोठडीतून दोन आरोप पळाले