रावेर- खेलो इंडीया खेलो वेटलिफ्टींग स्पर्धेत रावेरच्या अभिषेक महाजन याला सुवर्ण पदकची कमाई केली आहे. पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडीया खेलो वेटलिफ्टींग स्पर्धेत रावेर येथील अभिषेक गणेश महाजन या खेळाडूंने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत 55 किलो वजनी गटात 17 वर्षा आतील मुलांच्या स्पर्धेत 211 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकविले. अभिषेक महाजन याचे राष्ट्रीय स्पर्धेत सलग पाचवे पदक असून सलग तिसरे सुवर्ण पदक आहे. अशी कामगीरी करणारा तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदक मिळवणार -संदीप महाजन
सन 2018 मध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर रावेरच्या खेळाडूंनी जवळपास 35 पदके पटकाविली त्यात तीन वेळ राज्य स्पर्धेत विजेते व उप विजेतेपदाचा समावेश आहे. अभिषेक महाजन हा येणार्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवील, अशी खात्री त्याचे प्रशिक्षक संदीप महाजन यांनी व्यक्त केली. अभिषेक महाजन हा खेळाडू रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता 11 वी सायन्सचा विद्यार्थी आहे. ो रावेर येथील व्हि.एस.नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील जिमखान्यात वेटलिफ्टींग प्रशिक्षक अजय महाजन, संजय महाजन, लखन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. या खेळाडूंची रावेर शहरात ‘गोल्डन मॅन’ अशी ओळख आहे. त्याच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मिसर, राज्य संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा संघटनेचे सचिव संजय गिसर, प्रकाश बेलस्कर, आगोद महाजन, यशवंत महाजन, व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ. पी.व्ही.दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील, रावेर शिक्षण संघाचे चेअरमन चेअरमन प्रकाश मुजूमदार, सरदार जी.जी.हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन.कोल्हे, क्रीडा शिक्षक टी.बी.महाजन, ई.जे.महाजन, जे.के.पाटील, युवराज माळी आदींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.