खेळांमुळेच शारीरीक व बौद्धिक विकास

0

भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव ः क्रॉस कंट्री स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

भुसावळ- पूर्वी आपल्या देशात केवळ क्रिकेट व काही मोजकेच खेळ खेळले जायचे मात्र आता जगभरातील विविध खेळात युवा पिढी पुढे जात असून त्यामुळे शारीरीक व बौद्धिक विकास होत असल्याचे प्रतिपादन भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी येथे केले. रविवारी आरपीएफ मैदानावर आयोजित 44 व्या आरपीएफ आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची अनेक खेळाडूंमध्ये क्षमता
डीआरएम आर.के.यादव पुढे म्हणाले की, सध्या रेल्वे विभागात अनेक खेळाडू असून देशाचे प्रदेशात प्रतिनिधीत्व करण्याची क्षमता ठेवतात. प्रत्येकाने शिक्षणावर भर दिला पाहिजे मात्र शारीरिक व बौद्धिक विकासासाठी खेळावर सुद्धा नेहमीच लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या हस्ते विजेत्या संघासह विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

असे आहेत स्पर्धेतील विजेते
100 मीटर धावण्यात सुशील चौधरी (पुणे, प्रथम) सोहनवीर (मुंबई तर) अमोल (नागपूर) तृतीय ठरला. महिला मीट धावण्यात शंतना सरकार (मुंबई, प्रथम), शमा परवीन (द्वितीय) व हेमालिनी (तृतीय) विजेती ठरली. 4 बाय 100 रीले पुरूष- प्रथम मुंबई, द्वितीय- नागपूर तर भुसावळ संघ- तृतीय ठरला. 1500 मीटर धावणे, 800 मीटर धावणे बीपी स्पर्धांमधील स्पर्धांमधील गोविंदा मीना, मुकेश कुमार, सुमित, फराहनाज अंसारी, महेजबी खातुन, शमा परवीन, सुनीता सिंग, उषा टीगगा, सीमा यादव, सोहन वीर इरफान शेख, धर्मेंद्र सिंग, धीरज कुमार, नावेद शेख, रोशन जमीर, इमदाद खान, शिल्पा उखाडे, सविता इंगवले, विजय सिंग, संदीप, हिवालनी लिलीमा, अर्पणा किंडो, कुमारी रंजू, गजेंद्र सिंह, योगेंद्रसिंग देशराज मीना, योगेंद्र यादव आदी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यांची उपस्थिती होती
यावेळी वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) एन.के.अग्रवाल, वरीष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता सुमित प्रसाद, सहाय्यक आयुक्त राजेश दीक्षित, सुरेशचंद, आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, दिनेश नायर, अतुल टोके, एस.एस.गुरचळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन रेल्वेच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राचे पीटी प्रशिक्षक चांद खान व शंकर एडले यांनी केले.